* छोट्या- छोट्या बिया आरोग्यासाठी चांगल्या ...
आशा बियांना आपण 'छोटा पॅकेट बडा धमाका' म्हणू शकतो सब्जा, चिया, जवस, तीळ, अशा आकारांना छोट्या अगदी छोट्या असलेल्या बिया गुणवत्तेने मात्र परिपूर्ण असतात. अतिशय पोषक अशा तिळाचा वापर आपण काही प्रमाणात करतो . तसंच जवसाचाही वापर करतो, जवसाचा वापर ही हल्लीच्या काळात मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. पण, काही फळ आणि भाज्यांच्या भरपूर पोषण देणाऱ्या बियांकडे मात्र आपण दुर्लक्ष करत आहोत. तांबड्या भोपळ्याच्या बिया, काकडीच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, तसंच मेलन सीड म्हणजेच कलिंगडाच्या किंवा टरबूज खरबुजांच्या बिया तुम्ही खाऊन बघितल्या आहेत का ? या बिया अतिशय चविष्ट लागतात तसेच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. या बिया भाजून जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून खाता येतात.
तर सर्व बियांचा वापर आता आपण खालील प्रमाणे पाहूया.
तीळ :-
थंडीचा हंगामामध्ये आपण तिळाचा भरपूर वापर करतो. संक्रातीच्या सणाला तीळ आणि गूळ एकत्र करून पोषक आणि चविष्ट पदार्थ केला जातो. भाकरीवर तीळ वापरले जातात. थंडीमध्ये तिळामधून शरीराला आवश्यक असलेले उष्मांक तर मिळतातच . शिवाय चांगल्या प्रकारचे प्रोटीनही मिळतात, तिळामधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं आणि त्याचबरोबर झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे आपल्याला मिळतं त्यामुळे हाडांचा आरोग्य चांगलं राहतं. त्यामधून बी कॉम्प्लेक्स विटामिन सुद्धा मिळतात.
जवस :-
जवस म्हणजेच आळशी किंवा फ्लेक्स सीडना सुपर food संबोधलं जातं! मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासशोधनानुसार, जवसामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे औषधी गुणधर्म असतात तसेच एंटीऑक्सीडेंट असतात; तसेच अँटिऑक्सिडंट असतात. उच्च रक्तदाब, मधुमेह , तसेच रक्तवाहिनी विकार आटोक्यात ठेवणारे गुणधर्मही असतात . जवसामध्ये ओमेगा थ्री हे चांगल्या प्रकारचं फॅट भरपूर प्रमाणात असतं. तसंच फायबर प्रोटीनही असतात.
भोपळ्यांच्या बिया :-
संध्याकाळच्या वेळेत खायला काहीतरी तोंडात टाकायला छोटासा स्नॅक लागतो, त्यावेळी तांबड्या भोपळ्यांच्या बिया हा खूप चांगला पर्याय असतो. भोपळ्यांच्या बिया विविध प्रकारामध्ये उपलब्ध असतात. किंवा फ्रॉईड, रोस्टेड, साल्टेड आपण घेताना कच्च्या वाळवून सोललेल्या बियाच विकत घ्यायच्या , किंवा घ्यायला हव्यात . आपण त्या घरी भाजून वापरू शकतो. या बिया नुसत्याही खाऊ शकतो. तसंच मध्ये किंवा चाट प्रकारांमध्ये वापरल्या तर छान चव तर येते, शिवाय कुरकुरीत क्रंची ही मिळतो. या बियामधून प्रोटीन , फायबर आणि चांगल्या प्रकारचे फॅट तर मिळतच; शिवाय भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम , पोटॅशियम मिळतं.
सब्जा :-
उन्हाळ्यामध्ये सरबातात लायला सब्जा सिड, अर्थात तुळशीच्या बिया तुम्ही नक्की वापरल्या असतील. आकाराने अगदी लहान, कळ्या रंगाच्या सब्जासिड पाण्यात भिजवून वापराव्या लागतात. या बिया पाण्यात टाकल्यावर फुगतात आणि त्यांच्या भोवती एक पारदर्शक आवरण तयार होतं. या बियांना तुळशीचा एक सौम्यवास आणि चव असते ज्या पदार्थात घालू त्याला तो वास मिळतो. सब्जा बिया अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवल्या आणि जेवणाच्या आधी खाल्ल्या तर त्याला त्यातील फायबर मुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि कमी खाल्लं जातं. त्यामुळे वजन कमी करायला या बियांची मदत होते . या बियांमुळे पोटाला थंडावा मिळतो म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून सब्जासीडचा वापर केला जातो.
चीया :-
सब्जा आणि च्या सीड या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आहेत . काही वेळा यामध्ये गलत होऊ शकते चिया सीड करड्या, पांढऱ्या, कळ्या, ब्राऊनिष अशा रंगाचा असतात. सब्जासिडच्या मानाने किया सीड आकाराने थोड्या मोठ्या अस चियासिड खास करून मेक्सिकोमध्ये पिकतात . आणि भारतात आयात केल्या जातात. या सीड पाण्यात भिजवून किंवा कच्च्या स्वरूपात किंवा भाजूनही वापरतात.
No comments:
Post a Comment