Monday, February 19, 2024

अंजिराच्या अगदी नवीन रेसिपीज

 सुके अंजीर


पिकलेली चांगली ताजी फळे घ्यावीत, त्यांचा टीएसएस 15 ते 18 टक्के असावा.

 निवडलेली फळे स्वच्छ पाण्याने धुऊन मसलीन कपड्यांमध्ये बांधावी. ती कॅल्शियम बायकार्बोनेट एक टक्का म्हणजेच 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात 20 ते 30 मिनिटे ठेवावीत.

 फळे थंड करून ड्रायरमध्ये एकसमान पसरावीत. ती ड्रायर मध्ये 55 ते 65 अंश सेल्सिअस तापमानाला दोन दिवस ठेवावी.


 फळातील पाण्याचे प्रमाण 15 ते 20 टक्के झाल्यास फळे सुकली आहेत असे समजावे.

 सुकलेले फळे काढून थंड करून ते दाबून ठेवावी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करावीत.

 पाच किलो ताज्या अंजिरापासून साधारणता 500 ते 700 ग्रॅम सुके अंजीर मिळतात

रस

दहा टक्के अंजीर घराचा टीएसएस दहा टक्के असतो यामध्ये 0.1 ते 0.3 असते टक्का अमला असते.

 एक लिटर अंजिराचा रस गाळून घेतलेल्या गरामध्ये एक किलो साखर आणि एक ते तीन ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळावे या गरांमध्ये 9 लिटर पाणी चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे.

 बनलेले मिश्रण मंद आचेवर पाच मिनिटे गरम करावे. नंतर थंड करून घ्यावे थंड केलेले पिण्यास तयार असे द्रावण (रस) निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे.

अंजीर कँडी


पिकलेली चांगली फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन पुसून कोरडी करून घ्यावीत.

 नंतर कॅल्शियम बायकार्बोनेट पहिली पाण्याला एक ग्रॅम प्रमाणे पाण्यात चार तास टाकून ठेवावेत.

 साखरेचा एक तारी पाक तयार करून थंड झाल्यावर त्यात अंजीर कोरडे करून टाकावेत व एक रात्र तसेच ठेवावेत.

 दुसऱ्या दिवशी आधीच्या साखरेच्या पाकातून अंजीर काढून ते थंड करून तिसऱ्या दिवशी तीन तारी पाक तयार करून त्यात अंजीर सायट्रिक ऍसिड एक ग्रॅम व सोडियम बायकार्बोनेट एक ग्रॅम टाकावे रात्रभर तसेच ठेवावे.

 त्यानंतरच्या दिवशी चाळणीद्वारे पाक काढून वेगळा करावा. साखर अंजिराच्या पाकळ्या सूर्यप्रकाश किंवा सौर वाळवणी यंत्रामध्ये एक ते दोन दिवस दिवसांसाठी वाळवून घालाव्या. 60  टक्के आर्दरतेपर्यन्त वाळवायच्या त्या आधी वाळवून कोरड्या केल्यास कडक होण्याचा धोका असतो. 

अंजीर पोळी


पिकलेली चांगली निरोगी फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत . 

फळांची देठे काढून बारीक फोडी करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत मिक्सरमधून काढलेला गर मसलीन कपड्यामधून गाळून घ्यावा.

 एक किलो गरामध्ये दीडशे ते दोनशे ग्रॅम साखर व पाच ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे शिजवावे.

 शिजवलेले मिश्रण ट्रेमध्ये एकसमान पसरून वाळविण्यासाठी ठेवावे.

 वाळलेले अंजीर पोळीचे तुकडे करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवावे.


जॅम 

45 टक्के अंजीर घराचा टी एस एस 68 टक्के असतो यामध्ये 0.5 ते 0.6% आमला असते.

 एक लिटर गाळून घेतलेल्या घरामध्ये 750 ग्रॅम साखर आणि पाच ते सहा ग्रॅम साठी आम्ल मिसळावी. स्टीलच्या पातेल्यात मंद आचेवर शिजवावे. मिश्रण विरघळेपर्यंत आणि घट्ट द्रव्य होईपर्यंत हलवत रहावे. घट्ट झालेले मिश्रण चे टी एस एस बघून तो जाम निर्जंतुक केलेल्या बाटल्यामध्ये भरावे आणि त्वरित सीलबंद करावे.

No comments:

Post a Comment

महावितरणामध्ये नोकरीची मोठी संधी , महावितरण मध्ये 5347 पदांसाठी महाभरती , दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी , शेवटची संधी लगेचच अर्ज करा

  महावितरणामध्ये नोकरीची मोठी संधी , महावितरण मध्ये 5347 पदांसाठी महाभरती , दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी , शेवटची संधी लगेचच अर्ज करा  Up...