Wednesday, February 21, 2024

Parenting tips :- मुलांना चांगल्या सवयी लावण्याच्या पद्धती जेणेकरून मुल रागीट आणि उद्धट होणार नाही.

 Parenting tips in marathi:-  तुमची मुलंही हल्ली रागीट होत चालली आहेत का ? रागीट मुलांना कसे शांत कसं शांत करायचे , आणि त्यांना कसे सुसंस्कृत बनवायचे जाणून घ्या या पुढील पद्धती .




रागीट आणि उद्धट होते का मूल? तूम्ही रागवण्यापेक्षा अशा पद्धतीने हाताळा परिस्थितीत लगेच दिसेल फरक .....

Parenting tips in Marathi :-  आपली मुलं कशीही असली म्हणजे दिसायला काळी असेल किंवा गोरी असली किंवा वाईट असली किंवा चांगली असली असली आई वडिलांसाठी ती नेहमी एका राजकुमारापेक्षा किंवा राजकन्या पेक्षा कमी नसतात.








तुम्हाला माहिती आहे का मूल जेव्हा लहान असते तेव्हा त्याला शिकवणे आणि संस्कार देणे अधिक सोप्पे असते,  जेव्हा मुलं मोठी होऊन लागतात तेव्हा, त्यांचे स्वातंत्र्य विचार , वागणूक व्यवहार यामध्ये फरक जाणू लागतो आणि त्याचा त्रास आई-वडिलांना आणि वडीलधाऱ्या  व्यक्तींना होतो





वावाढत्या वयानुसार त्यांचे विचार ,इच्छा आणि भावना व्यक्त करण्याचे नवीन मार्ग ते शोधत असतात . या काळात ते आपला मुद्दा मांडण्यासाठी हट्टीपणाचा मार्ग अवलंबतात तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला असा फरक दिसून येत असेल,  तर पालक म्हणून तुम्ही नक्की तुमच्या मुलाशी कसे वागायला हवे आणि कशा पद्धतीने मुलांचा हा रागीटपणा आणि उद्धटपणा कमी करता येईल.







#)  चला जाणून घेऊया या पुढच्या सवयी मुलांचा हट्टीपणा आणि उद्धटपणा सोडवण्याच्या सवयी पुढीलप्रमाणे आहेत.... 


लक्षपूर्वक ऐका:-मूल काय म्हणते ते लक्षपूर्वक ऐका त्यांचे म्हणणे तुम्हाला समजत आहे असे त्यांना वाटले पाहिजे. 


शांत रहा:-     मुलं जेव्हा हट्ट करतात किंवा रागवतात तेव्हा प्रथम तुम्ही स्वतःला शांत ठेवा. तुमची शांतता मुलाला शांत  करण्यात देखील मदत करेल आणि तो तुमचा रिप्लाय का येईल अशाच पद्धतीने तो वागेल म्हणून शांत रहा .


समजून सांगा आणि समजून घ्या:-    काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे मुलाला समजावून सांगा . त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा मुलांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांना समजावून सांगितल्यास गोष्टी लवकर पटतात व ते आत्मसात करतात. 


 सकारात्मक प्रोत्साहन:-   मुलांच्या चांगल्या वागणुकीची प्रशंसा करा हे त्यांना कळाले की चांगल्या वागणुकीचे कौतुक केले जाते ते पुढे सुद्धा तसंच वागण्याचा प्रयत्न करतील . जर मुलाच्या हातून एखादी चूक घडली असेल तर त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करा रागावू किंवा ओरडू नका. जेणेकरून तुमचं मूल रागीट बनणार नाहीत. नियम आखा चांगल्या आयुष्यासाठी नियम पाळणे आणि अनुशासन असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक आई-वडिलांना आपले मूल शिस्तबद्ध असावे असेच वाटते आणि त्यासाठी योग्य नियम आणि गोष्टीचे पालन करणे ही गरजेचे आहे. 


भांडणे टाळा :- शक्यतो आई-वडिलांनी मुलांसमोर भांडणे टाळावीत. 


समाजातील वागणूक:-   समाजात वावरत असताना आपण आपले वर्तन हे चांगलेच ठेवले पाहिजे त्यातूनच आपले मुलं घडतात. म्हणून आपल्या वागणुकीचे ते अनुकरण करून ते तसेच वागतात म्हणून आपले वर्तन आणि वागणूक समाजामध्ये वावरत असताना योग्य पद्धतीची असली पाहिजे.






No comments:

Post a Comment

महावितरणामध्ये नोकरीची मोठी संधी , महावितरण मध्ये 5347 पदांसाठी महाभरती , दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी , शेवटची संधी लगेचच अर्ज करा

  महावितरणामध्ये नोकरीची मोठी संधी , महावितरण मध्ये 5347 पदांसाठी महाभरती , दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी , शेवटची संधी लगेचच अर्ज करा  Up...