Thursday, February 15, 2024

अंजिराचे शरीरासाठी महत्त्व

 



"अंजीर फळ पक्वता गाठल्यानंतर लवकर खराब होते . बाजारांमध्ये असलेल्या दरांना विकावे लागते . हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः प्रक्रियेकडे वळणे गरजेचे आहे. प्रक्रियेनंतर तयार झालेले पदार्थ दीर्घकाळ टिकतात आणि अधिक दराने विकले जातात . यामुळे ताज्या फळांच्या दरांच्या चढउताराची जोखीम कमी होते.

अंजीर फळ हे शक्तीवर्धक, वातशामक असून, पोषक आणि औषधी आहे. त्याचे शास्त्रीय नाव फायकास कॅरीका असून, ते मोरेसी  कुळातील आहे. हे उंबराच्या जातीचे फळ ताजे व सुके अशा दोन्ही रूपात खाता येते.

औषधी गुणधर्म :- 



अंजिराच्या फळांमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ , प्रथिने मेद, कर्बोदके, कॅल्शियम ,फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ अ व क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अंजीर स्वतंत्रपणे व इतर अन्नपदार्थ बरोबर खाल्ल्यास त्याची पौष्टिकता वाढते. ते वाळवून सुके अंजीर ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये वापरले जाते. अंजीर शीत गुणात्मक मधुर व पचनास जड असते. अंजीर खाल्ल्याने कफ बाहेर पडतो . त्यामुळे कफ विकार दूर करण्यासाठी मदत होते. म्हणजे पिकल्यानंतर शीतवीर्य  व सारक असते ताजे अंजीर हे सुख्या अंजिरापेक्षा जास्त पौष्टिक असते. कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात विटामिन C विटामिन A असते. आणि सुक्यांची मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. अंजिराच्या अनेक जाती असून गुलाबी, लाल ,काळी ,पांढरी लहान, मोठी ,तुर्की अशे प्रकार उपलब्ध  आहेत.

उपयोग  :- 

#  अंजिरातील अधिक लोह घटक अमाशयाला जास्त क्रियाशील बनवते . परिणामी भूक लागते रक्तक्षय (ॲनिमिया) या आजारांमध्ये अंजीर उपयुक्त ठरते अंजीरामुळे रक्ताचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते .

# कच्च्या अंजिराची जिरे ,मोहरी, कोथिंबीर घालून भाजी करावी यामुळे शरीरातील ए जीवनसत्व व लोह यांचे प्रमाण प्राकृत राहते.

 # पिकलेल्या अंजिराचा मुरब्बा करून वर्षभर खावा. हा मुरब्बा दहा नाशक पित्तनाशक आणि रक्तवर्धक असते .

#  अंजीरामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असून, रोजच्या सेवनाने मलावस्तंभ नाहीसा होतो. सौच्या साफ होते .

#  नियमित सेवनाने सप्तधातूचे पोषण होऊन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

 #  शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अन्य रक्त शुद्धीसाठी पिकलेल्या अंजिराचे दोन भाग विभाजन करून त्यामध्ये गुळ भरून ठेवावा . पहाटे ब्रह्म मुहूर्तावर चूळ भरून खावे. असे नियमित सेवन केल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढतेच व उष्णताही कमी होते. 

#  अंजिराच्या नियमित सेवनाने आजारपणात शरीराचे झालेली हानी लवकर भरून येते .उत्साह वाढू लागतो मानसिक थकवा ही दूर होतो. 

#  मुखपाक या आजारात ओठ ,जीभ, तोंड यांना कात्रे पडतात व फोड येतात. अशावेळी अंजीर खाल्ल्यास या जखमा लवकर भरून येतात .कच्च्या अंजिराचा चिक या जखमांना लावावा.

#   मुळव्याधीवर अंजीर हे औषधाप्रमाणे कार्य करते . थंड पाण्यामध्ये दोन ते तीन अंजीर रात्रभर भिजत घालून सकाळी खावे. हा प्रयोग सलग महिनाभर केल्यास मुळव्याध हा आजार आटोक्यात आणता येतो 

#  अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर, खजूर, बदाम व लोणी एकत्र करून खावे. पंधरा दिवसात अशक्तपणा कमी होऊन शरीरात शक्ती प्राप्त होते .

#  अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये उत्तम कार्य करते. श्वेतकृष्ठा मध्ये (पांढरे डाग ) अंजिराचा नियमितपणे आहार सेवन केल्यास फायदा होतो .

#  पायांना जळवातांचा भेगा पडल्या असतील तर कच्चा अंजिराचा चिक लावल्यास लवकर भरून येतात .

#  दम्यावरही अंजीर आणि लालरस पांढरी गोरख चिंच समप्रमाणात घेऊन रोज सकाळी व एक तोळा खावी. त्यामुळे श्वसनक्रिया सुलभ होते दम्याचा त्रास कमी होतो .

#  अंजिराचा उपयोग गळवांवर देखील करता येतो. अंजीर चटणी सारखे बारीक वाटून गरम करून त्यांचे पोटी स गाठीवर किंवा गळावावर बांधावे . दर दोन तासांच्या अंतराने नवे पोटीस करून बांधल्यास वेदना कमी होतात. अपरिपक्व व गाठ लवकर पक्व होते गळण्यास सुरुवात होतो .

 सावधानता :-

 अंजीर बहुगुणी आणि उपयुक्त असले तरी पचनास जड आहे. अतिप्रमाणात अंजीर खाल्ल्यास अपचन व संबंधित आजार उद्भवू शकतात. आपल्या स्वतःच्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन योग्य प्रमाणातच अंजीर खावे.




No comments:

Post a Comment

महावितरणामध्ये नोकरीची मोठी संधी , महावितरण मध्ये 5347 पदांसाठी महाभरती , दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी , शेवटची संधी लगेचच अर्ज करा

  महावितरणामध्ये नोकरीची मोठी संधी , महावितरण मध्ये 5347 पदांसाठी महाभरती , दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी , शेवटची संधी लगेचच अर्ज करा  Up...