Saturday, March 16, 2024

महावितरणामध्ये नोकरीची मोठी संधी , महावितरण मध्ये 5347 पदांसाठी महाभरती , दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी , शेवटची संधी लगेचच अर्ज करा

 महावितरणामध्ये नोकरीची मोठी संधी , महावितरण मध्ये 5347 पदांसाठी महाभरती , दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी , शेवटची संधी लगेचच अर्ज करा 

Updated on : March 16 / 2024 


Mahavitran recruitment 2024 :- 


 गेल्या काही दिवसापासून महावितरण विभागाकडून बंपर भरती प्रक्रिया या राबवल्या जात आहेत . विशेष म्हणजे दहावी पास ते पदवीधर उमेदवारासाठी या भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत . नुकतीच एका भरती प्रक्रियेची अधिसूचना ही महावितरण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे .


मुंबई:-  


सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरुवात झाली आहे . नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भारती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत . विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील जाहिरात करण्यात आली आहे . 

 ग उशीर कशाला करताय खरोखरच ही मोठी संधी आहे . या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात , चला तर मग जाणून घेऊया या भरती प्रक्रिया बद्दलची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याच्या पद्धती ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरण विभागाकडून राबवली जात आहे . विद्युत सहाय्यक ही पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. 


 तीन वर्षांच्या कंत्राटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर तंत्रज्ञ या पदावर थेट घेतले जाणार आहे . ही भरती प्रक्रिया तब्बल 5347 पदांसाठी पार पडत आहे ही एक प्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरती नक्कीच म्हणावी लागेल . या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आठ ही लागू करण्यात आली आहे . अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास आणि आयटीआय पास असणे आवश्यक आहे . 18 ते 29 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात . यावरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षाही द्यावी लागणार आहे . या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही तुम्हाला 

 www.mahadiscom.in 

 या साइटवर मिळेल याच साइटवर जाऊन तुम्हाला या भरतीसाठी भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे . या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत . या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे . त्यापूर्वी आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत . 250 रुपये फीस ही उमेदवारांना द्यावी लागेल यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना थोडी सूट देण्यात आली महावितरणामध्ये नोकरी करण्याची थेट संधी ही तुमच्याकडे आहे . चला तर मग लगेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. 


Mahavitran recruitment 


पदसंख्या :- 5347

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख :- 14 March 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 March 2024

शैक्षणिक अट :- 10th pass

वयोमर्यादा :- 18 -29 

अर्ज फीस :- 250 

अर्ज करण्याचे संकेतस्थळ :-www.mahadiscom.in 


अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या...

पशुसंवर्धन विभागात मेगा भरती , दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी , तब्बल इतकी पदे जाणार भरली

 पशुसंवर्धन विभागात मेगा भरती , दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी , तब्बल इतकी पदे  जाणार भरली 

 BPNL Bharti 2024 / updated on : March 16 , 2024 



BPNL Bharti 2024 : अनेकांचे स्वप्न सरकारी नोकरी करण्याचे असते . आता हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधीही तुमच्याकडे आहे . विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरुवात झाली इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेसाठी पटापट अर्ज हे करावी 



मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी नक्कीच आहे . विशेष म्हणजे मेगा भरती ला सुरुवात झाली असून,  इच्छुकांनी फटाफट भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत थेट केंद्र शासनाचे नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे .  विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे . भरती विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाचे अट देखील पदानुसार लागू करण्यात आली आहे . या भरती प्रक्रियेसाठी वयाचे अट देखील लागू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपण देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून आरामात अर्ज करू शकता हे खरोखरच मोठी सुवर्णसंधी आहे .

 

 ही भरती प्रक्रिया भारतीय पशुपालन निगम लिमिटेड (BPNL )कडून राबवली जाते नुकताच् भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आली थेट भारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे . ही भरती प्रक्रिया तब्बल 1125 रिक्त पदांसाठी सुरू असून या भरती प्रक्रियेतून तब्बल  1125 रिक्त पदे भरली जाणार आहेत . या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 14 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मार्च 2024 आहे . शेवटच्या तारखेच्या अगोदर पर्यन्त आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत .  उशिरा आलेला अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत Animal husbandry corporation of India limited Bharti pashupalan.com 


 या साइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावे लागतील.  हेच नाही तर    Animal husbandry corporation of India limited Bharti pashupalan.com या साइटवर तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती हे मिळेल . केंद्र प्रभारी या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.  केंद्र विस्तार अधिकारी या पदासाठी उमेद्वार हे बारावी पास असायला हवा केंद्र साहाय्यक या पदासाठी उमेदवार हे दहावी पास असायला हवा या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास ते पदवीधर उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात 

 या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत ही द्यावी लागेल . त्यातूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल . या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी 944 रुपये फीस ही भरावी लागणार आहे . यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आली आहे .


BPNL :- पद भरती प्रक्रिया 


पद संख्या :- ११२५ 

शैक्षणिक अट :- १२ वी पास

                   पदवीधर ( कोणत्याही शाखेत) 


अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख :-  14 March 2024 


अर्ज भरण्याची शेवटची तारीख :-   21 March 2024 

फिस :- 944

Website :- Animal husbandry corporation of India limited Bharti pashupalan.com  


वयाची अट लागू आहे 

अधिक माहितीसाठी दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन माहिती सविस्तर जाणून घ्यावी व अर्ज करावेत 

Wednesday, February 21, 2024

Parenting tips :- मुलांना चांगल्या सवयी लावण्याच्या पद्धती जेणेकरून मुल रागीट आणि उद्धट होणार नाही.

 Parenting tips in marathi:-  तुमची मुलंही हल्ली रागीट होत चालली आहेत का ? रागीट मुलांना कसे शांत कसं शांत करायचे , आणि त्यांना कसे सुसंस्कृत बनवायचे जाणून घ्या या पुढील पद्धती .




रागीट आणि उद्धट होते का मूल? तूम्ही रागवण्यापेक्षा अशा पद्धतीने हाताळा परिस्थितीत लगेच दिसेल फरक .....

Parenting tips in Marathi :-  आपली मुलं कशीही असली म्हणजे दिसायला काळी असेल किंवा गोरी असली किंवा वाईट असली किंवा चांगली असली असली आई वडिलांसाठी ती नेहमी एका राजकुमारापेक्षा किंवा राजकन्या पेक्षा कमी नसतात.








तुम्हाला माहिती आहे का मूल जेव्हा लहान असते तेव्हा त्याला शिकवणे आणि संस्कार देणे अधिक सोप्पे असते,  जेव्हा मुलं मोठी होऊन लागतात तेव्हा, त्यांचे स्वातंत्र्य विचार , वागणूक व्यवहार यामध्ये फरक जाणू लागतो आणि त्याचा त्रास आई-वडिलांना आणि वडीलधाऱ्या  व्यक्तींना होतो





वावाढत्या वयानुसार त्यांचे विचार ,इच्छा आणि भावना व्यक्त करण्याचे नवीन मार्ग ते शोधत असतात . या काळात ते आपला मुद्दा मांडण्यासाठी हट्टीपणाचा मार्ग अवलंबतात तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला असा फरक दिसून येत असेल,  तर पालक म्हणून तुम्ही नक्की तुमच्या मुलाशी कसे वागायला हवे आणि कशा पद्धतीने मुलांचा हा रागीटपणा आणि उद्धटपणा कमी करता येईल.







#)  चला जाणून घेऊया या पुढच्या सवयी मुलांचा हट्टीपणा आणि उद्धटपणा सोडवण्याच्या सवयी पुढीलप्रमाणे आहेत.... 


लक्षपूर्वक ऐका:-मूल काय म्हणते ते लक्षपूर्वक ऐका त्यांचे म्हणणे तुम्हाला समजत आहे असे त्यांना वाटले पाहिजे. 


शांत रहा:-     मुलं जेव्हा हट्ट करतात किंवा रागवतात तेव्हा प्रथम तुम्ही स्वतःला शांत ठेवा. तुमची शांतता मुलाला शांत  करण्यात देखील मदत करेल आणि तो तुमचा रिप्लाय का येईल अशाच पद्धतीने तो वागेल म्हणून शांत रहा .


समजून सांगा आणि समजून घ्या:-    काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे मुलाला समजावून सांगा . त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा मुलांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांना समजावून सांगितल्यास गोष्टी लवकर पटतात व ते आत्मसात करतात. 


 सकारात्मक प्रोत्साहन:-   मुलांच्या चांगल्या वागणुकीची प्रशंसा करा हे त्यांना कळाले की चांगल्या वागणुकीचे कौतुक केले जाते ते पुढे सुद्धा तसंच वागण्याचा प्रयत्न करतील . जर मुलाच्या हातून एखादी चूक घडली असेल तर त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करा रागावू किंवा ओरडू नका. जेणेकरून तुमचं मूल रागीट बनणार नाहीत. नियम आखा चांगल्या आयुष्यासाठी नियम पाळणे आणि अनुशासन असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक आई-वडिलांना आपले मूल शिस्तबद्ध असावे असेच वाटते आणि त्यासाठी योग्य नियम आणि गोष्टीचे पालन करणे ही गरजेचे आहे. 


भांडणे टाळा :- शक्यतो आई-वडिलांनी मुलांसमोर भांडणे टाळावीत. 


समाजातील वागणूक:-   समाजात वावरत असताना आपण आपले वर्तन हे चांगलेच ठेवले पाहिजे त्यातूनच आपले मुलं घडतात. म्हणून आपल्या वागणुकीचे ते अनुकरण करून ते तसेच वागतात म्हणून आपले वर्तन आणि वागणूक समाजामध्ये वावरत असताना योग्य पद्धतीची असली पाहिजे.






Monday, February 19, 2024

Sarkari naukari 2024 (सरकारी नोकरी 2024)


 Sarkari naukari : सहकारीता विभाग मे ९६९ पदो पर होगी बहाली,  पढिये विधानसभा सरकारने क्या कुछ कहा...


Sarkari Naukri सहकारीता विभाग मे १३ सहाय्यक निबंधक ,५ जिला अंकेक्षण पदाधिकारी, ९ निम्नवर्गीय लिपिक तथा कार्यालय निबंधक ,२५५ अंकेक्षक की नियुक्ती होगी . और किन विभागाने होगी बहाली

सरकारीता विभाग की ओर से इस साल ९६९ विभिन्नपदो पर बहाली की जायेगी. इसमे कोई पदोपर बहाली प्रक्रियाधीन है. बिहार सरकारने  विधान सभा मे इसकी जानकारी दि. इसके साथ ही 460 गोदामुका निर्मान किया जायेगा पहिले फेज मे चा४४७७ पॅक्स  कम्प्युटरकरण कीय जा रहा है .१६०१ पॅक्स मे कम्प्युटरकरण होगा . जिला व प्रमंडल स्तरीय कार्यालय को एक छत के नीचे लाने के लिए सहकार भवन का निर्माण कराया जा रहा है 17 सहकार भवन का निर्माण पूर्ण हो चुका है.

१०० पॅक्स मे कृषी संयंत्र बँक स्थापित होंगे

वर्ष 2024 -25 मे पाच सहकार भवन का निर्माण कार्य पूर्ण होगा . खाद्य प्रसंस्कारन एवं मूल्य संवर्धन हेतू चावल मिल स्थापन के लीये राष्ट्रीय कृषी विकास योजना के तहत कुल 474 चावल मिल्की स्थापना हो चुकी है . 100 पेक्स मे कृषी संयंत्रण बँक स्थापित किया जायेगा. 103 पॅक्स मे जण औषधी केंद्र खोले जा रहे है. वित्तीय वर्ष 2024 -25 मे स्कीम मे 962. 42 करोड रुपये तथा स्थापन एवं प्रतिबद्ध  वय्य मे 246.94 करोड रुपये खर्च के जायेंगे . विभाग की और से कुल 1, 209.36 करोड रुपये बजेट उपबंध का प्रस्ताव रखा गया है.


लिपिक , अंकेक्षक समेत काई पदो पर बहाली

13, सहाय्यक निबंधक पाच जिल्हा अंकेक्षण पदाधिकारी ,9 निम्नवर्गीय लिपिक तथा कार्यालय निबंध , 255 अंकेक्षक की नियुक्ती होगी. साथ ही सात सहायक निबंधक, 133 निम्नवर्गीय लिपिक की नियुक्ती प्रक्रियाधीन हे. बिहार राज्य भंडार निगम मे विभिन्नपदो पर 69 नियुक्त प्रक्रियाधीन है. बिहार राज्य सब्जी प्रसंस्कारन एवं  विपणन योजना अंतर्गत तीनो स्तरो पर गठित समितीयों  मे विभिन्न स्तर पर कुल 478 लोगो की नियुक्ती की जा रही है.
48,787 किसानो मे वितरित किया गया ऋण: सहकारी बँक से इस साल 16 जानेवारी तक 48, 787 कृषीको को 150 करोड रुपये का किसान क्रेडिट कार्ड ऋण वितरण किया गया है. 5,661 पॅक्स मे कॉमन सेवा केंद्र की स्थापना की गई है . शेष मे वर्ष 2024 - 25 मे कॉमन सेवा केंद्र की स्थापना होगी.

कुकुट पालना बद्दलची माहिती उन्हाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापन

 उन्हाळ्यात वातावरणातील तापमान वाढले की शरीराचे तापमान कमी करण्यासाठी कोंबड्या तोंडावाटे उष्णता बाहेर टाकतात त्याचा विपरीत परिणाम वाढ आणि रोगप्रतिकारक क्षमतेवर होतो हे लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात

विशेषतः मार्च एप्रिल मे आणि जून या महिन्यात कोंबड्यांच्या व्यवस्थापनात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे कोंबड्यांना आपल्यासारखे शरीराचे तापमान नियंत्रण करता येत नाही कारण त्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसतात कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी 18 ते 23 अंश सेल्सिअस तापमान पुरेसे आहे पण कोंबड्या 28 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान सहन करू शकतात कोंबड्या उन्हाळ्यात वातावरणातील तापमान वाढले की शरीराचे तापमान कमी करण्यासाठी तोंडावाटे उष्णता बाहेर टाकतात त्याला प्यटिंग (धापणे)म्हणतात उन्हाळ्यात प्रत्येक वेळी त्यांना शारीरिक तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी प्यटिंग आधार घ्यावा लागतो त्याचा विपरीत परिणाम वाढ आणि रोगप्रतिकारक क्षमतेवर होतो.

#  उष्माघाताचे लक्षणे  #

१)  उन्हाळ्यातील वातावरणातील तापमान वाढल्यानंतर कोंबड्यांना उष्णतेचा त्रास वाढतो त्यानंतर ताण पडल्यावर कोंबडी जोरजोराने श्वास घेण्याचा प्रयत्न करतात श्वासन मार्ग कातडी व पोटाचे स्नायू याकडे रक्ताचा पुरवठा वाढतो .

२)  पाणी पिण्याचे प्रमाण वाढते खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते.

३)  उष्णतेचा त्रास होऊन हगवण लागते त्यामुळे शरीरातील आवश्यक इलेक्ट्रो लाईट निघून जातात त्यामुळे कोंबडी खूप कमजोर आणि क्षीण बनते.
विष्टेमधील पाण्याचे प्रमाण वाढल्याने तूस गादी जास्त ओली होते गादी मधील अमोनियम चे प्रमाण वाढते त्यामुळे श्वासनलिकेचा त्रास उद्भवतो

४)  उष्माघाताचा त्रासामुळे कोंबड्या शांतपणे बसून राहतात त्यांच्यात मंद व सुस्तपणा दिसून येतो.

५)  रोग रोगप्रतिकारक क्षमता कमी होते जास्त उष्माघातामुळे मरतुकीचे प्रमाण वाढते. 
 
६)  खाद्याचे  मांसात रूपांतर  करण्याची क्षमता कमी होते , वजनात घट होते , कोंबड्या भिंतीच्या आडोशाला पडून राहतात.

 ७)  पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ थंड जागेत मान वाकून बसतात , शरीराचे तापमान कमी करण्यासाठी , थंडपणा आणण्यासाठी पंख शरीरापासून दूर पसरवितात ,  दम लागल्याने तोंडाची उघडझाप करून धाप टाकतात.

८)   त्वचा रखरखीत होते , रंगांमध्ये बदल दिसून येतो , अंड्यांची गुणवत्ता कमी होते .

९)  18 ते 21 अंश वाढीसाठी सोयीस्कर तापमान .

१०)  22 ते 25 अंश हे तापमान त्रासदायक नसते परंतु खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते .

 ११)  26 ते 30 अंश तापमानात दिवसभरात खाद्य खाण्याचे प्रमाण घटते , त्यांना उष्णतेचा त्रास जाणवू लागतो .

१२)  31 ते 35 अंश तापमानात उष्माघाताचा त्रास वाढतो , खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते , तोंडाने श्वास घेतात.
 
१३)  ३५ अंश हे तापमान खूप हानिकारक असते मरतुक होण्याची शक्यता वाढते.




उपाययोजना :-

- उन्हाळ्यात पाणी पिण्याचे क्षमता वाढते त्यामुळे शुद्ध व थंड पाणी मुबलक प्रमाणात पुरवावे .

- उन्हाळ्यात थोडी जास्त मोकळी हवा उपलब्ध करून द्यावी शेड मधील संख्या इतर ऋतूपेक्षा कमी ठेवावी 

-  शेड मधील कामे पहाटे सकाळी पूर्वी करावीत.

 -  उन्हाळ्यात दुपारच्या वेळेत शेड मधील कामे टाळावीत 

-  पिण्याच्या पाण्यातून जीवनसत्व A , k , आणि  e पुरवावीत त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता उत्तम राहील

- क्लोरीन युक्त पाण्याचा वापर करावा त्यामुळे पाण्यातून होणारे आजार टाळता येतील .

-   पिण्याच्या पाण्याची भांडी संख्या दुपटीने वाढवावी लसीकरण पहाटे किंवा रात्रीच्या वेळी करावे.

व्यवस्थापन

-  उन्हाळ्यात खाद्य देण्याचे एक वेळापत्रक ठरवून घ्यावे तज्ञांच्या सल्ल्याने काटेकोरपणे पालन करावे.

-   उन्हाळ्यात कोंबड्या चार आठवड्याच्या झाल्यावर त्यांना दुपारच्या वेळेत खाद्य देऊ नये.

-   उन्हाळ्यात दुपारच्या वेळेत खाद्य भांडी उंचीवर ठेवावी

-   उन्हाळ्यात खाद्य अन्नघटक प्रथिने अमिनो आम्ल आणि मेदयुक्त असावे त्यामुळे कोंबडी कमी खाद्य खाऊन जास्तीत जास्त अन्नघटक मिळावेत .

-  उन्हाळ्यातील खाद्य घटकात तेलाचा वापर अधिक प्रमाणात करावा खाद्यात ऊर्जेचे प्रमाण 180 ते 150 किलो कॅलरीने कमी करून अमिनो आम्ल जीवनसत्वे आणि खनिजे यांचा वापर अधिक प्रमाणात करावा.

-  अंडी देणाऱ्या कोंबडीच्या खाद्यात खाण्याचा सोडा 750 ते 1000 ग्रॅम प्रति टन या प्रमाणात वापरावा त्यामुळे अंड्याचे कवच मजबूत राखण्यास मदत होईल.

 -  मार्बल चे तुकडे / शिंपला चुरा चुरा संतुलित खाद्यावर दिवसातून एक वेळेस पसरावा त्यामुळे अंड्यांची गुणवत्ता राखता येईल.

 -  शेड ची लांबी पूर्व पश्चिम ठेवावी जेणेकरून थेटवून येण्याचे प्रमाण कमी होईल हवा खेळती राहील बाजू भिंती आणि मध्यभागाची उंची जास्तीत जास्त ठेवावी छत शक्यतो आयासबेस्तोस पत्र्याचे असावे. 

-   शेडच्या रुंदीच्या भिंतीस घराबाहेर हवा टाकणारे पंखे बसवावेत .

-  शक्य असल्यास छतावर उष्णता रोधक आवरण पसरवावे वाळलेले गवत पसरवल्याने वातावरण थंड राहील.

-   शेडच्या आजूबाजूला झाडे असावीत त्यामुळे सभोवतालचे वातावरण थंड राहते तापमान कमी राखण्यास मदत होईल.

-   बारदाना बाजूच्या भिंतीला जाळीस लावून ओली करावीत असे करताना शेडमधील आर्द्रता वाढणार नाही आणि तूच ओली होणार नाही याची काळजी घ्यावी.

-   छतावर स्प्रिंकलर्स लावावेत जेणेकरून शेडमध्ये थंडावा राहील . 

-  शेडमध्ये फॉगर्स बसवावेत त्यामुळे तापमान कमी राखण्यास मदत होईल.

-   पिण्याचे पाणीपुरवठा करणारी टाकी शेडमध्ये बसवावी जर बाहेर टाकी असेल तर त्यास बारदानाच्या साह्याने गुंडाळून त्यावर थंड पाणी मारावे.

छोट्या छोट्या खाद्य बियांचे आरोग्यासाठी महत्त्व

 *  छोट्या- छोट्या बिया आरोग्यासाठी चांगल्या ... 

आशा बियांना आपण 'छोटा पॅकेट बडा धमाका' म्हणू शकतो सब्जा, चिया, जवस, तीळ, अशा आकारांना छोट्या अगदी छोट्या असलेल्या बिया गुणवत्तेने मात्र परिपूर्ण असतात. अतिशय पोषक अशा तिळाचा वापर आपण काही प्रमाणात करतो . तसंच जवसाचाही वापर करतो, जवसाचा वापर ही हल्लीच्या काळात मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. पण, काही फळ आणि भाज्यांच्या भरपूर पोषण देणाऱ्या बियांकडे मात्र आपण दुर्लक्ष करत आहोत. तांबड्या भोपळ्याच्या बिया, काकडीच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, तसंच मेलन सीड म्हणजेच कलिंगडाच्या किंवा टरबूज खरबुजांच्या बिया तुम्ही खाऊन बघितल्या आहेत का ? या बिया अतिशय चविष्ट लागतात तसेच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. या बिया भाजून जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून खाता येतात.

तर सर्व बियांचा वापर आता आपण खालील प्रमाणे पाहूया.

तीळ :-

थंडीचा हंगामामध्ये आपण तिळाचा भरपूर वापर करतो. संक्रातीच्या सणाला तीळ आणि गूळ एकत्र करून पोषक आणि चविष्ट पदार्थ केला जातो. भाकरीवर तीळ वापरले जातात. थंडीमध्ये तिळामधून शरीराला आवश्यक असलेले उष्मांक तर मिळतातच . शिवाय चांगल्या प्रकारचे प्रोटीनही मिळतात, तिळामधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं आणि त्याचबरोबर झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे आपल्याला मिळतं त्यामुळे हाडांचा आरोग्य चांगलं राहतं. त्यामधून बी कॉम्प्लेक्स विटामिन सुद्धा मिळतात.

जवस :-

जवस म्हणजेच आळशी किंवा फ्लेक्स सीडना सुपर food संबोधलं जातं! मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासशोधनानुसार, जवसामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे औषधी गुणधर्म असतात तसेच एंटीऑक्सीडेंट असतात; तसेच  अँटिऑक्सिडंट असतात. उच्च रक्तदाब, मधुमेह , तसेच रक्तवाहिनी विकार आटोक्यात ठेवणारे गुणधर्मही असतात . जवसामध्ये ओमेगा थ्री हे चांगल्या प्रकारचं फॅट भरपूर प्रमाणात असतं. तसंच फायबर प्रोटीनही असतात.

भोपळ्यांच्या बिया :-

संध्याकाळच्या वेळेत खायला काहीतरी तोंडात टाकायला छोटासा स्नॅक लागतो, त्यावेळी तांबड्या भोपळ्यांच्या बिया हा खूप चांगला पर्याय असतो. भोपळ्यांच्या बिया  विविध प्रकारामध्ये उपलब्ध असतात. किंवा फ्रॉईड,  रोस्टेड, साल्टेड आपण घेताना कच्च्या वाळवून सोललेल्या बियाच विकत घ्यायच्या , किंवा घ्यायला हव्यात . आपण त्या घरी भाजून वापरू शकतो. या बिया नुसत्याही खाऊ शकतो. तसंच मध्ये किंवा चाट प्रकारांमध्ये वापरल्या तर छान चव तर येते, शिवाय कुरकुरीत क्रंची ही मिळतो. या बियामधून प्रोटीन , फायबर आणि चांगल्या प्रकारचे फॅट तर मिळतच;  शिवाय भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम , पोटॅशियम मिळतं.

सब्जा :-

उन्हाळ्यामध्ये सरबातात लायला सब्जा सिड, अर्थात तुळशीच्या बिया तुम्ही नक्की वापरल्या असतील. आकाराने अगदी लहान, कळ्या रंगाच्या सब्जासिड पाण्यात भिजवून वापराव्या लागतात. या बिया पाण्यात टाकल्यावर फुगतात आणि त्यांच्या भोवती एक पारदर्शक आवरण तयार होतं. या बियांना तुळशीचा एक सौम्यवास आणि चव असते ज्या पदार्थात घालू त्याला तो वास मिळतो. सब्जा बिया अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवल्या आणि जेवणाच्या आधी खाल्ल्या तर त्याला त्यातील फायबर मुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि कमी खाल्लं जातं. त्यामुळे वजन कमी करायला या बियांची मदत होते . या बियांमुळे पोटाला थंडावा मिळतो म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून सब्जासीडचा वापर केला जातो.

चीया :- 

सब्जा आणि च्या सीड या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आहेत . काही वेळा यामध्ये गलत होऊ शकते चिया सीड करड्या, पांढऱ्या, कळ्या, ब्राऊनिष अशा रंगाचा असतात. सब्जासिडच्या मानाने किया सीड आकाराने थोड्या मोठ्या अस चियासिड खास करून मेक्सिकोमध्ये पिकतात . आणि भारतात आयात केल्या जातात. या सीड पाण्यात भिजवून किंवा कच्च्या स्वरूपात किंवा भाजूनही वापरतात.

" या सर्वच पदार्थांमध्ये खनिजे मोठ्या प्रमाणावर मिळतात. यात विटामिन डी, कॅल्शियम,  मॅग्नेशियम ,पोटॅशियम फॉस्फरस, लोह नैसर्गिक तेल अदी गोष्टी भरपूर प्रमाणात मिळतात. यासह रक्त पातळ करणारे ओमेगा 3, रक्तवाहिनीच्या भिंतींना चरबीची चिटकू न देणारे ओमेगा 6  देखील असते. त्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल वाढत नाही . याचे सेवन मेंदू, हृदय, हाडे, फुफ्फुस, लहान-मोठे आतडे मुलांच्या वाढीसाठी आणि मानसिक विकारात ही लाभदायक ठरते. यातील एका पदार्थाचे दिवसातून किमान 20 ग्रॅम सेवन करावे. यामुळे पचनसंस्थेलाही लाभ मिळतो आणि प्रतिकारशक्ती ही वाढते."

अंजिराच्या अगदी नवीन रेसिपीज

 सुके अंजीर


पिकलेली चांगली ताजी फळे घ्यावीत, त्यांचा टीएसएस 15 ते 18 टक्के असावा.

 निवडलेली फळे स्वच्छ पाण्याने धुऊन मसलीन कपड्यांमध्ये बांधावी. ती कॅल्शियम बायकार्बोनेट एक टक्का म्हणजेच 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात 20 ते 30 मिनिटे ठेवावीत.

 फळे थंड करून ड्रायरमध्ये एकसमान पसरावीत. ती ड्रायर मध्ये 55 ते 65 अंश सेल्सिअस तापमानाला दोन दिवस ठेवावी.


 फळातील पाण्याचे प्रमाण 15 ते 20 टक्के झाल्यास फळे सुकली आहेत असे समजावे.

 सुकलेले फळे काढून थंड करून ते दाबून ठेवावी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करावीत.

 पाच किलो ताज्या अंजिरापासून साधारणता 500 ते 700 ग्रॅम सुके अंजीर मिळतात

रस

दहा टक्के अंजीर घराचा टीएसएस दहा टक्के असतो यामध्ये 0.1 ते 0.3 असते टक्का अमला असते.

 एक लिटर अंजिराचा रस गाळून घेतलेल्या गरामध्ये एक किलो साखर आणि एक ते तीन ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळावे या गरांमध्ये 9 लिटर पाणी चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे.

 बनलेले मिश्रण मंद आचेवर पाच मिनिटे गरम करावे. नंतर थंड करून घ्यावे थंड केलेले पिण्यास तयार असे द्रावण (रस) निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे.

अंजीर कँडी


पिकलेली चांगली फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन पुसून कोरडी करून घ्यावीत.

 नंतर कॅल्शियम बायकार्बोनेट पहिली पाण्याला एक ग्रॅम प्रमाणे पाण्यात चार तास टाकून ठेवावेत.

 साखरेचा एक तारी पाक तयार करून थंड झाल्यावर त्यात अंजीर कोरडे करून टाकावेत व एक रात्र तसेच ठेवावेत.

 दुसऱ्या दिवशी आधीच्या साखरेच्या पाकातून अंजीर काढून ते थंड करून तिसऱ्या दिवशी तीन तारी पाक तयार करून त्यात अंजीर सायट्रिक ऍसिड एक ग्रॅम व सोडियम बायकार्बोनेट एक ग्रॅम टाकावे रात्रभर तसेच ठेवावे.

 त्यानंतरच्या दिवशी चाळणीद्वारे पाक काढून वेगळा करावा. साखर अंजिराच्या पाकळ्या सूर्यप्रकाश किंवा सौर वाळवणी यंत्रामध्ये एक ते दोन दिवस दिवसांसाठी वाळवून घालाव्या. 60  टक्के आर्दरतेपर्यन्त वाळवायच्या त्या आधी वाळवून कोरड्या केल्यास कडक होण्याचा धोका असतो. 

अंजीर पोळी


पिकलेली चांगली निरोगी फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत . 

फळांची देठे काढून बारीक फोडी करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत मिक्सरमधून काढलेला गर मसलीन कपड्यामधून गाळून घ्यावा.

 एक किलो गरामध्ये दीडशे ते दोनशे ग्रॅम साखर व पाच ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे शिजवावे.

 शिजवलेले मिश्रण ट्रेमध्ये एकसमान पसरून वाळविण्यासाठी ठेवावे.

 वाळलेले अंजीर पोळीचे तुकडे करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवावे.


जॅम 

45 टक्के अंजीर घराचा टी एस एस 68 टक्के असतो यामध्ये 0.5 ते 0.6% आमला असते.

 एक लिटर गाळून घेतलेल्या घरामध्ये 750 ग्रॅम साखर आणि पाच ते सहा ग्रॅम साठी आम्ल मिसळावी. स्टीलच्या पातेल्यात मंद आचेवर शिजवावे. मिश्रण विरघळेपर्यंत आणि घट्ट द्रव्य होईपर्यंत हलवत रहावे. घट्ट झालेले मिश्रण चे टी एस एस बघून तो जाम निर्जंतुक केलेल्या बाटल्यामध्ये भरावे आणि त्वरित सीलबंद करावे.

महावितरणामध्ये नोकरीची मोठी संधी , महावितरण मध्ये 5347 पदांसाठी महाभरती , दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी , शेवटची संधी लगेचच अर्ज करा

  महावितरणामध्ये नोकरीची मोठी संधी , महावितरण मध्ये 5347 पदांसाठी महाभरती , दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी , शेवटची संधी लगेचच अर्ज करा  Up...